Beed District Hospital : मनुष्यबळ अपुरे पण तज्ज्ञांची पदे मात्र रिक्त, जिल्हा रुग्णालयात नेमकं चाललंय काय

जिल्हा रुग्णालयाची स्थिती : मंजूर ५१४ पदांपैकी ११९ पदे रिक्त
beed district hospital
beed district hospitalSAKAL

Beed Healthcare News : जिल्हा रुग्णालयात रुग्णसंख्या, गंभीर व दुर्धर आजारांवरील उपचार आणि किचकट शस्त्रक्रयांची संख्या वाढली आहे. मात्र, तज्ज्ञांची रिक्तपदे आणि श्रेणीवर्धन हे दुखणे कायम आहे. ३२० खाटांची क्षमता असलेल्या रुग्णालयात रोज पाचशेंवर रुग्णांवर उपचार होतात.

विशेष म्हणजे ३२० खाटांच्या क्षमतेनुसार मंजूर असलेल्या ५१४ पैकी १९ पदे आजही रिक्त आहेत. विशेष म्हणजे वर्ग एक अधिकाऱ्यांची २० पैकी केवळ पाच पदे भरलेली आहेत.

जिल्हा रुग्णालयाला वाढीव २०० खाटा आणि महिला व बाल या नव्या रुग्णालयाच्या १०० अशा एकूण ६२० खाटांची श्रेणीवर्धन होण्याची देखील गरज आहे. मुळ खाटांच्या तुलनेत ४० वर्षांपूर्वीच्या आकृतीबंधानुसार मंजूर पदांपैकी ११९ पदे रिक्त असून श्रेणीवर्धनानुसार भरती आवश्यक पदांचा आकडा पाचशेंच्या पुढे आहे. आता नवे सरकार याबाबत काय, निर्णय घेते हे महत्त्वाचे आहे.

जिल्हा रुग्णालयात स्त्री रोग, औषधीशास्त्र, अस्थिरोग, शल्यचिकित्सा आदी विविध विभागांत खाटांची मंजूर संख्या ३२० असली तरी रोज आंतररुग्णांचा आकडा मात्र ५०० च्या घरात आहे. त्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळावर उपचार करताना नाकीनऊ येत आहेत.

जिल्हा रुग्णालयात कर्करोग, स्पाईन, मेंदू अशा गंभीर आजारांवरील व कृत्रिम सांधेरोपणासारख्या शस्त्रक्रीया देखील झाल्या आहेत. डायलिसीस व नेत्रशस्त्रक्रियेत जिल्हा रुग्णालय राज्यात अव्वल आहे. मात्र, रिक्त पदे व अपुरे मनुष्यबळ हे जिल्हा रुग्णालयाचेच दुखणे कायम आहे.

beed district hospital
Mental Health : मूड खराब असताना खाऊ नका 'या' गोष्टी

सहा महिन्यांत पाच हजार शस्त्रक्रिया

जिल्हा रुग्णालयात मागील सहा महिन्यांत दोन लाख रुग्णांवर उपचार झाले आहेत. तर, तब्बल पाच हजार शस्त्रक्रिया झाल्याची माहिती, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश साबळे यांनी दिली. या काळात बाह्यरुग्ण विभागात १ लाख ९२ हजार ५३३3 रुग्णांवर उचार झाले. तर त्यातील ५९ हजार ४२ रुग्णांनी दाखल होऊन उपचार केले. यापैकी ४९६९ रुग्णांवर विविध यशस्वी शस्त्रक्रिया केल्या गेल्या.

यात १८ हजार ९३१ रुग्णांची सोनोग्राफी, ५७३९ रुग्णांची ईसीजी, २१४१ रुग्णांचा सिटीस्कॅन करण्यात आले. जिल्हा रुग्णाच्या प्रयोगशाळेत या कालावधीत तब्बल २ लाख ४९ हजार ८१० रुग्णांच्या रक्त, लघवीच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. तब्बल ४१७६ शस्त्रक्रियाही करण्यात आल्या. डोळ्यांच्या ८०३२ शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती, डॉ. सुरेश साबळे यांनी दिली.

beed district hospital
ताप आल्यावर फक्त गोळ्या खाऊ नका, करा हे घरगुती उपाय Health Tips

मनुष्यबळ अपुरे व तज्ज्ञांची पदे रिक्त असली तरी अवघड शस्त्रक्रिया व गंभीर आजारांवरील उपचार सुरू आहेत. रुग्णसंख्या वाढल्याने श्रेणीवर्धनाचा व रिक्तपदे भरती व नवीन पदमान्येसाठी प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. आमची टिम उत्तम सेवा देण्यास कटिबद्ध आहे.

डॉ. सुरेश साबळे,

जिल्हा शल्यचिकीत्सक, बीड.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com