बीड - खुद्द पक्षप्रमुख अजित पवार जिल्ह्याचे पालकत्व सांभाळत आहेत. पक्षाचा वर्धापन दिन तोंडावर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही जवळ आलेल्या असल्याने सदस्य नोंदणीसह संघटनवाढीसाठी प्रयत्न सुरु आहेत. पण, जिल्ह्यात पक्ष शिलेदारांविना पोरका आहे. एक जिल्हाध्यक्ष आणि तीन तालुकाध्यक्षांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा संघटनात्मक कारभार सुरु आहे. आठ तालुकाध्यक्षांसह युवक, सामाजिक न्याय, महिला, युवती, ओबीसी अशा पक्षाच्या विविध आघाड्यांना सहा महिन्यांपासून कार्यकारीण्यांच नाहीत.