

Beed District Ranks First in Maharashtra Health Performance
esakal
बीड :- आरोग्य व्यवस्थापन व माहिती पद्धती (एचएमआयएस) अंतर्गत कुटुंब कल्याण, माताबाल संगोपन आणि नियमित लसीकरण कार्यक्रमात ऑक्टोबर २०२६ अखेर झालेल्या कामाच्या राज्यस्तरीय गुणानुक्रम अहवालात बीड जिल्ह्याने तब्बल ९० गुण पटकावत राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाचे अतिरिक्त संचालक डॉ.संदीप सांगळे यांनी २५ नोव्हेंबर २०२६ रोजी हा अहवाल प्रसिद्ध केला असून, त्यामध्ये बीडने सर्वच जिल्ह्यांवर बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे.