
बीड : बीड जिल्हा क्रीडा संकुलाचा चेहरामोहरा आता बदलणार आहे. उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बुधवारी (ता. सहा) बीड जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या बैठकीत जिल्हा क्रीडा संकुलाच्या विविध सुविधा, क्रीडा साहित्य, प्रेक्षागृह, लॉन इत्यादींसाठी कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून २५ कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती दिली.