Beed News: कधीकाळी स्त्रीभ्रूण हत्येत; आता जन्मदरात टॉप; बीड जिल्ह्यात लिंग गुणोत्तर ९६५ वर, आरोग्य विभागाच्या उपाययोजना
Girl Child Rights: एकेकाळी स्त्रीभ्रूण हत्येसाठी बदनाम असलेला बीड जिल्हा आता मुलींच्या जन्मदरात राज्यात अव्वल ठरला आहे. आरोग्य विभागाच्या उपाययोजना आणि जनजागृतीमुळे १२ वर्षांत जन्मदरात तब्बल १८६ ने वाढ झाली आहे.
बीड : एकेकाळी स्त्रीभ्रूण हत्या, बेकायदा गर्भलिंग निदान आणि गर्भपातामुळे बदनाम आणि राज्यात सर्वाधिक गुन्हे नोंद झालेला बीड जिल्हा आता स्त्री जन्मदारात विभागात टॉपवर पोचला आहे.