

Doctors Save Accident Victim
esakal
बीड :- माणुसकी, संवेदना आणि सेवाभाव या गोष्टी केवळ भाषणात किंवा कागदावर शोभत नाहीत, तर त्या ऐन प्रसंगी कृतीतून सिद्ध कराव्या लागतात, याचे एक सुवर्ण उदाहरण बीडमध्ये पाहायला मिळाले आहे. बीडमधील एका कार्यक्रमासाठी जाताना बाळाघाटाच्या उतरणीवर झालेल्या एका भीषण अपघातात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमी तरुणाला वाचवण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय संचालक डॉ.अशोक थोरात आणि डॉ.प्रतिभा थोरात हे डॉक्टर दांपत्य देवदूतासारखे धावले. स्वतःच्या कपड्यांची किंवा प्रतिष्ठेची पर्वा न करता रक्ताने माखलेल्या शेरवानीतच त्यांनी रुग्णावर उपचार करत मानवतेचे अनोखे दर्शन घडवले.