Beed News : करपलेली पिके अन् डोळ्यात अश्रू... बीडच्या बांधावर 'पालकमंत्री' सुनेत्रा पवार अन 'पंकजाताई मुंडे'

तुम्ही धीर सोडू नका, सरकार तुमच्या पाठीशी खंबीर; दिवाळीच्या आधी मदत करू; उपमुख्यमंत्र्यासह पंकजाताईचा बळीराजाला मायेचा धीर
dcm sunetra pawar visit to beed farmer agriculture loss

dcm sunetra pawar visit to beed farmer agriculture loss

sakal

Updated on: 

​बीड - खरीप २०२६ च्या हंगामात पावसाने दिलेल्या ताण आणि उन्हाच्या तीव्र झळांमुळे बीड जिल्ह्यातील शेती पूर्णपणे करपून गेली आहे. डोळ्यांदेखत वाळून जाणारी पिके आणि तोंडचा घास हिरावल्याने हवालदिल झालेला बळीराजा डोळ्यात अश्रू आणून मदतीची वाट पाहत आहे. या बिकट आणि गंभीर टंचाईच्या पार्श्वभूमीवर, राज्य शासनाने बीड जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्यानंतर प्रशासकीय आणि राजकीय यंत्रणा थेट बळीराजाच्या दारी पोहोचली आहे.

Pankaja Munde

Pankaja Munde

sakal

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com