Crime News : बीडमध्ये नशेच्या गोळ्यांच्या रॅकेटचा पुन्हा पर्दाफाश झाला असून पोलिसांनी अडीच लाख रुपयांचा साठा जप्त करून चौघांना अटक केली. या गोळ्यांचा वापर लहान मुलांनाही नशेसाठी केला जात असल्याचे समोर आले आहे.
बीड : शहरात काही महिन्यांपूर्वी उघडकीस आलेल्या नशेच्या गोळ्यांच्या रॅकेटनंतर पोलिसांनी कडक कारवाई करून हा अवैध व्यवसाय थांबवला होता. मात्र, पुन्हा एकदा नवीन टोळ्यांनी या धंद्याला हात घालून बीड शहरात नशेचे जाळे पसरवण्यास सुरवात केली आहे.