Beed News: प्रशासनाचा वरवंटा फक्त गोरगरिबांवरच का?; बड्या धेंडांना राजाश्रय ; अतिक्रमण हटाव मोहिमेचा दांभिकपणा झाला उघड

Beed Encroachment Removal Drive Under Scrutiny: बीड शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत गोरगरीबांवर कारवाई होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
Beed News

Beed News

esakal

Updated on

बीड: जसीबीचा तो कानठळ्या बसवणारा मोठा आवाज, पोलिसांचा मोठा ताफा आणि मनपाच्या कर्मचाऱ्यांची धावपळ... हे सगळे पाहून बीड शहर आता खऱ्या अर्थाने चकाचक होणार, अशा अपेक्षा सामान्य बीडकरांनी मोलल्या होत्या. दोन दिवसांपासून शहरात प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहिमेचा मोठा गाजावाजा सुरू केला आहे.

मात्र, या मोहिमेच्या मागे दडलेले एक अत्यंत संतापजनक आणि विरोधाभासी वास्तव आता समोर आले आहे. दोन वेळच्या भाकरीसाठी रस्त्याकडेला छोटेशी टपरी चालवणाऱ्या आणि भाजीपाला विकून आपल्या कुटुंबाचा गाडा ओढणाऱ्या गोरगरीबांच्या पोटावर प्रशासनाचा बुलडोझर अगदी सहज चालवला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com