

Beed
esakal
बीड: शहरात सध्या सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेने बीडकरांच्या आशा पल्लवित केल्या होत्या. वर्षानुवर्षे ज्या बीडच्या रस्त्यांनी अतिक्रमणाचा सुळसुळाट आणि वाहतुकीची कोंडी अनुभवली, त्याच रस्त्यांनी आता कुठे मोकळा श्वास घ्यायला सुरुवात केली होती.