

Beed News
esakal
बीड: एका बाजूला पिकवलेला माल बाजारपेठेत नेण्यासाठी धडपडणारा बळीराजा, तर दुसरीकडे पिढ्यानपिढ्यांचा वहिवाटीचा रस्ता जाणीवपूर्वक खोदून किंवा बांध घालून अडवणारा शेजारी... ग्रामीण भागातील हे चित्र आज घराघरातील वादाचे आणि पोलिस ठाण्यातील राड्याचे मुख्य कारण बनले आहे. शेतरस्ता न मिळाल्याने पेरणीची अवजारे शेतात नेता येत नाहीत की काढलेला माल बाहेर काढता येत नाही. यातूनच निर्माण होणारे तणावाचे वातावरण कधी हाणामारीत, तर कधी थेट पोलिस कोठडीत रूपांतरित होते.