

Beed News
esakal
बीड: निसर्गाच्या लहरीपणाशी दोन हात करत घाम गाळणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नशिबी पुन्हा एकदा उपेक्षाच आली आहे. मृग नक्षत्रात आभाळाकडे डोळे लावून पेरणी करणाऱ्या आणि अतिवृष्टीच्या संकटातही उभ्या पिकाची राखण करणाऱ्या शेतकऱ्याला आता अधिकारी आणि विमा कंपनी या दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. खरिपाची आस होती, ती निसर्गाने हिरावली. आता रब्बीची वेळही निघून गेली, तरीही विम्याच्या रूपाने मिळणारी हक्काची मदत तांत्रिक त्रुटींच्या गर्तेत अडकून पडली आहे. बीडचा बळिराजा आता साश्रू नयनांनी विचारतोय, आमचा वाली कोण?