Beed: मृगाची चाहूल; बीडच्या शिवारात शेतीकामांची लगबग; संकटांच्या छाताडावर पाय देत बळिराजाची पूर्वतयारी; मशागतीला गती

Beed Farmers Begin Intensive Kharif Preparations: बियाणे, खते, डिझेल दरवाढ, मजूरटंचाई आणि प्रलंबित पीकविमा यांसारख्या अडचणींचा सामना करत बळिराजा नव्या आशेने पेरणीपूर्व मशागतीत व्यस्त झाला आहे.
Beed

Beed

esakal

Updated on

बीड: उन्हाळ्याचे कडक ऊन हळूहळू सुसह्य होऊ लागले आहे आणि आकाशाच्या कोपऱ्यात ढगांची पुसटशी गर्दी दिसू लागली आहे. मृग नक्षत्र अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याची जाणीव होताच, संपूर्ण बीड जिल्ह्यातील शिवाराचे रूप पालटले आहे. डोक्याला रुमाल बांधून, हातात नांगराची धुरा धरत किंवा ट्रॅक्टरच्या आवाजासह शेतकरी शेतात दाखल होत आहेत. वेळेवर पेरणी झाली तरच पीक हाती येईल या एकाच ध्यासाने बळिराजा सध्या शिवारात दिवस-रात्र घाम गाळत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com