

Beed
esakal
बीड: धरण उशाला अन् कोरड घशाला, आम्हाला विमानतळ नको. आधी पाणी सोडा! शेतकऱ्यांचा लोकलढा; पाणी सोडा, पाणी सोडा !..... अशा गगनभेदी अन् संतापजनक घोषणांनी बीडचा जिल्हाधिकारी कार्यालय परिसर आणि अहिल्यानगर रस्ता पुरता दणाणून गेला. जायकवाडी धरणातील हक्काचे पाणी सिंदफना नदीत तत्काळ सोडण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी लोकलढा आंदोलनाच्या वतीने आज प्रशासनाविरोधात एक भव्य आणि आक्रमक बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.