माजलगाव: दुपार होता होता रस्ते सामसूम होतात आणि अंगाची काहिली करणारे उष्ण वारे वाहू लागते. मे महिन्याच्या होरपळणाऱ्या उन्हातून घामाघूम होऊन नागरिक सायंकाळी घरी परततात, तेव्हा पंख्याखाली चार क्षण सुखाचे घालवावेत अशी त्यांची अपेक्षा असते. .मात्र, नेमक्या त्याच वेळी महावितरणची बत्ती गुल होते आणि सुरू होतो उकाड्याचा आणखी एक भयानक खेळ ! दिवसभर उन्हाचा तीव्र तडाखा आणि रात्रीच्या वेळी महावितरणने दिलेला अंधाराचा शॉक, अशा दुहेरी कात्रीत सध्या माजलगावकर पुरते अडकले आहेत. मे महिन्याच्या अखेरीसही उष्णतेचा कहर कायम असल्याने शहरातील आणि तालुक्यातील नागरिकांचे जनजीवन विस्कळित झाले आहे..PNG-LPG Rate: घरगुती गॅसच्या दरांत पुन्हा वाढ! सर्वसामान्यांना मोठा फटका; आता गॅससाठी किती पैसे मोजावे लागणार?.गेल्या काही दिवसांपासून उन्हामुळे विविध आजारांचे प्रमाण वाढले माजलगावच्या तापमानाचा पारा चाळिशी पार करत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळतो. या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी नागरिक थंड पेये, फळांचा रस, लस्सी आणि ताक यांचा आधार घेत आहेत..एकीकडे वाढत्या तापमानामुळे घराघरांमध्ये कूलर, एसी आणि पंखे सतत सुरू असल्याने विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, दुसरीकडे महावितरणकडून अशक्तपणा, तीव्र डोकेदुखी, उष्माघात आणि डिहायड्रेशन यांसारख्या शारीरिक तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे..या पार्श्वभूमीवर डॉक्टरांकडून नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दुपारच्या वेळेत विनाकारण घराबाहेर न पडणे, शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवण्यासाठी भरपूर पाणी पिणे, घराबाहेर पडताना डोक्यावर कपडा किंवा टोपी वापरणे आणि हलका आहार घेणे अशा महत्त्वपूर्ण सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत..Monsoon Favorable Conditions : मॉन्सूनला पोषक वातावरण! मोठे ढग तयार होण्यास सुरूवात; जूनच्या पहिल्या आठवड्यात गुड न्यूज, हवामान विभागाचा अंदाज.वारंवार होणारे लोडशेडिंग आणि तांत्रिक बिघाडांमुळे वीजपुरवठा खंडित होत आहे. दिवसासह रात्रीही अचानक वीज गायब होत असल्याने नागरिकांच्या संतापात भर पडत आहे. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका लहान मुले, वृद्ध आणि रुग्णांना बसत असून, महावितरणने संभाव्य तांत्रिक बिघाड तातडीने दूर करून सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे..उन्हामुळे विविध आजारांचे प्रमाण वाढलेअशक्तपणा, तीव्र डोकेदुखी, उष्माघात आणि डिहायड्रेशन यांसारख्या शारीरिक तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर डॉक्टरांकडून नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दुपारच्या वेळेत विनाकारण घराबाहेर न पडणे, शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवण्यासाठी भरपूर पाणी पिणे, घराबाहेर पडताना डोक्यावर कपडा किंवा टोपी वापरणे आणि हलका आहार घेणे अशा महत्त्वपूर्ण सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत..शेतकरीवर्ग पावसाच्या प्रतीक्षेतग्रामीण भागात शेतकरीवर्ग सध्या चातकासारखी पावसाची प्रतीक्षा करत आहे. शेतामध्ये पेरणीपूर्व मशागतीची कामे वेगाने सुरू असली, तरी असा उष्णतेमुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत. त्यातच अनेक भागांत पाण्याची टंचाई अत्यंत तीव्र झाली असून विहिरी आणि बोअरच्या पाण्याची पातळी झपाट्याने खाली गेली आहे. वाढत्या उकाड्यामुळे कधी एकदा पाऊस पडतो, अशी भावना व्यक्त होत असून सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांच्या नजरा आता मॉन्सूनकडे लागल्या आहेत.."शहरातील व्यापारी, छोटे उद्योगधंदे, वेल्डिंग • व्यावसायिक, पिठाच्या गिरण्या आणि थंड पेय विक्रेते यांनाही वीज खंडित होण्याच्या समस्येचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. सततच्या खंडित पुरवठ्यामुळे दैनंदिन व्यवसायावर अतिशय वाईट परिणाम होत आहे."- शेख सलीम, वेल्डिंग कामगार, माजलगाव..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.