मराठवाडा
Beed Flood: क्षीरसागर बंधुंचे एकमेकांकडे बोट; मात्र विरोधक म्हणातात हे तर तुमच्यामुळेच
Beed Flood Latest upadte: पाच वर्षांच्या नगर पालिकेत त्यांचे बंधू उपाध्यक्ष होते. पण, त्यांच्याकडूनही अपयशाबाबत दुसऱ्या क्षीरसागरांकडे बोट दाखविले जाते.
Latest beed News: जिल्ह्याचे ठिकाण आणि सर्वात मोठी नगर पालिका असलेल्या बीडमध्ये ना रस्ते धड आहेत ना नाल्या. पिण्याचे पाणी तीन आठवड्याला आणि पथदिवे बंद अशी बीडची अवस्था. आहेत त्या नाल्या काढल्या जात नाहीत आणि काढल्या तर घाणीची विल्हेवाट लवकर लागत नाही. येरव्हीची ही स्थिती पण मागच्या काही दिवसांत रोजच पाऊस येत असल्याने तुंबलेल्या आणि नसलेल्या नाल्यांमुळे रस्त्यांचेच गटार झाले.

