Beed: खड्ड्यात काड्या; कागदावर कोटींची झाडं; वन विभागाचा ३२ नंबर व्हाऊचरचा बनाव; नात्यांच्या जाळ्यातच विभागला सरकारी मलिदा.

Allegations of 32-Number Voucher Misuse: बीड वनविभागाच्या ३२ नंबर व्हाऊचरवरून झाडं फक्त कागदावर दिसत आहेत. नातलगांच्या खात्यात मजुरी, खड्ड्यांमध्ये वाळलेले काड्या; भ्रष्टाचाराचा पर्दाफाश.
Beed

Beed

esakal

Updated on

बीड: मार्च महिना उजाडला की सरकारी कार्यालयांमध्ये दिव्यांची ज्योत रात्री उशिरापर्यंत तेवत राहते. कुणाला वाटेल, ही धडपड प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी किंवा नवीन योजनांच्या अंमलबजावणीसाठी आहे. पण बीडच्या सामाजिक वनीकरण आणि वनविभागाच्या कार्यालयांत सुरू असलेली ही रात्रीची धावपळ कोणत्याही जंगल निर्मितीसाठी नसून, ३२ नंबर व्हाऊचरच्या माध्यमातून सरकारी तिजोरी साफ करण्यासाठी आहे.

जिल्ह्यात दरवर्षी लाखो झाडे लावल्याचा दावा मोठ्या थाटात केला जातो, पण प्रत्यक्षात जमिनीवर नजर टाकली तर खड्ड्यांमध्ये केवळ वाळलेल्या काड्या आणि धुळीचे साम्राज्य दिसते. कागदावर मात्र कोट्यवधींची झाडे डोलत असून, या बोगसगिरीचा धक्कादायक पर्दाफाश तक्रारदार अशोक पवार यांनी केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com