

Beed News
esakal
बीड: रखरखत्या उन्हात बीडचा शेतकरी अन् सामान्य नागरिक आपल्या हक्काच्या कामासाठी वनविभागाच्या पायऱ्या झिजवतोय, मात्र साहेबांच्या खुर्च्या कायमच रिकाम्या दिसतात. ‘साहेब दौऱ्यावर आहेत’ किंवा ‘साहेब आज येणार नाहीत’ हे उत्तर ऐकून सामान्य माणूस हवालदिल झाला आहे. पण धक्कादायक वास्तव हे आहे की, हे साहेब कोणत्याही सरकारी दौऱ्यावर नसून आपल्या मूळ गावी परजिल्ह्यात आरामात मुक्काम ठोकून बसलेले असतात. सरकारी तिजोरीतून पगार उचलायचा, पण कर्तव्याच्या नावाने मात्र बोंब. बीडच्या सामाजिक वनीकरण आणि विभागीय वन विभागात सध्या हाच संतापजनक प्रकार सुरू असून, प्रशासकीय शिस्तीचा पुरता बोजवारा उडाला आहे.