Laxman Hake : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यासह 14 जणांवर सुमोटो गुन्हा दाखल; अंगावर चपला फेकल्यानंतर गेवराईत झाला होता राडा
Shoes Hurled at OBC Leader Laxman Hake : घटनास्थळी मोठी गर्दी जमल्याने काही काळ वातावरण तणावग्रस्त बनले होते. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
बीड : गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काल ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) आणि आमदार विजयसिंह पंडित यांच्यात वादाची ठिणगी पेटली. या घटनेदरम्यान दोन्ही बाजूंच्या समर्थकांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला.