
बीड: नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थीनीचा लैंगीक छळ प्रकरणातील आरोपी विजय पवार व प्रशांत खाटोकरचे जप्त केलेले मोबाईल फाॅरेन्सिक लॅबला तपासणीसाठी पाठविले आहेत. या प्रकरणात महत्वाचे जबाबही पोलिसांनी नोंदवून घेतले आहेत. शिवाजी नगर पेालिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील विजय पवार व प्रशांत खाटोकर सध्या पोलिस कोठडीत आहेत.