Beed News: पारा चढल्याने जनजीवन थंडावले अन् चटके वाढले; तापमान ४३ अंश सेल्सिअसवर, रस्ते पडले ओस; उष्माघातापासून बचावासाठी तयारी

Rising Temperatures in Biad: 43°C Scorching Heat: बीडमध्ये उष्णतेचा प्रचंड तडाखा; तापमान ४३°C वर, रस्ते ओस पडले, उष्माघातापासून बचावासाठी उपाय व नागरिकांची सजगता.
Beed News

Beed News

esakal

Updated on

बीड: मागच्या पंधरा दिवसांपासून सूर्याने जणू बीड जिल्ह्यावर आग ओकण्यास सुरवात केली आहे. मंगळवारी तापमानाचा पारा ४४ अंशांकडे गेल्याची नोंद झाली. या वाढत्या तापमानामुळे बीडची बाजारपेठ थंडावली असून रस्ते भरदुपारी निर्मनुष्य होताना दिसत आहेत.

जिल्ह्यात उन्हाचा तडाखा इतका प्रचंड आहे की, सकाळी १० पासूनच चटके जाणवू लागतात. दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर पडणे जिकिरीचे झाले आहे. बीडमधील सर्वाधिक वर्दळीचा समजला जाणारा धुळे-सोलापूर महामार्ग दुपारच्या सत्रात पूर्णपणे ओस पडत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com