Beed News: बीड जिल्ह्यात हिरव्यागार झाडांची अवैध कत्तली; वनविभाग भ्रष्टाचारात सापळ्यात

Rampant Illegal Logging in Beed District: बीड जिल्ह्यात वनविभाग आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या भ्रष्ट कारभारामुळे हिरव्यागार झाडे नाश पावली. अवैध लाकूडतोडीवर खाकीच्याच खिशात वसुली, निधी हडपणे, जनतेत संताप.
Beed News

Beed News

esakal

Updated on

बीड: पर्यावरणाचे रक्षण ज्यांच्या खांद्यावर आहे, ज्यांच्या वर्दीवर निसर्ग रक्षणाची शपथ कोरलेली आहे, तेच आता लक्ष्मी दर्शनासाठी हिरव्यागार वृक्षांच्या कत्तलीला मूक संमती देत असल्याचा खळबळजनक प्रकार बीड जिल्ह्यात समोर आला आहे.

सामाजिक कार्यकर्ते अशोक पवार यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर जिल्ह्याच्या वन विभागात आणि सामाजिक वनीकरण विभागात मोठी खळबळ उडाली असून, भ्रष्ट अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण लागेबांधे आता चव्हाट्यावर आले आहेत. या धक्कादायक प्रकारामुळे पर्यावरणाचे रक्षकच आता भक्षक बनले आहेत की काय, असा संतप्त सवाल बीडकर विचारत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com