बीड - ज्या आकाचा (वाल्मीक कराड) वरदहस्त मिळवून परजिल्ह्यातून मोठ्या अट्टहासाने बीड जिल्ह्यात पोस्टींग आणि पोलिस ठाणे प्रभारीपद मिळविले त्याच अधिकाऱ्यांना आता बीड नको वाटायला लागले आहे.
आका कोठडीत, वाळू चोरी बंद, पोलिस अधीक्षक कडक आल्याने अवैध धंदेही बंद पडल्याने काही पोलिस अधिकाऱ्यांमध्ये एक प्रकारची हतबलता आल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातून साधारण १०० पोलिस अधिकाऱ्यांनी बदल्यांसाठी अर्ज केले आहेत. यात तब्बल ८४ अधिकाऱ्यांनी विनंती बदल्यांसाठी अर्ज आहेत हे विशेष. पाठीशी कोणी ‘वाली’च नसल्याने आता बीड बस्स अशी मानसिकता काही अधिकाऱ्यांची झाली आहे.
दरवर्षीच वार्षिक विनंती व प्रशासकीय बदल्यांसाठी अर्जांची संख्या याच्या निम्म्याने असते. परंतु, ज्या पाठीराख्याच्या मध्यस्थीने जिल्ह्यात पाय ठेवला आणि चांगल्या पोलिस ठाण्याचे (ज्या भागात वाळू घाट, इतर अवैध धंदे) प्रभारीपद मिळविले तोच आता कारागृहात असल्याने अशांनाही जिल्हा नकोसा झालाय हे विशेष.
सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निर्घुण हत्येच्या घटनेनंतर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा चव्हाट्यावर आला. याच घटनेच्या अनुषंगाने काही पोलिस अधिकारी वाल्मीक कराडच्या इशाऱ्यावर कसे वागत होते, याचे पुरावेही समोर आले. उदाहरण म्हटले तर, मस्साजोगच्या पवनचक्की प्रकल्पावर ता. सहा डिसेंबरला मारहाणीची घटना घडली.
परंतु, याचा गुन्हा खुनाच्या घटनेनंतर नोंदला गेला. संतोष देशमुख यांचे अपहरण केल्यानंतर गावकरी ठाण्यात जाऊन बसले तर गुन्हा खुन झाल्यानंतरच दाखल झाला. वाल्मीक कराड पक्ष कार्यालयात आल्यानंतर त्याच ठिकाणी विनाकारण वर्दीवर फिरणारा अधिकारीही आढळला.
परळीत सव्वा वर्षांपूर्वी झालेल्या महादेव मुंडे यांच्या खुनाचा अद्याप तपास झाला नाही. तर, खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी पकलेले वाळू वाहतूक करणारे हायवा पोलिस मुख्यालयातून काढून देण्यातही हातभार लावणारी मंडळी पोलिस दलात आहे.
अशा एक ना अनेक बाबींत वाल्मीकचे इशारे काही पोलिस अधिकाऱ्यांसाठी किती महत्वाचे होते हे सिद्ध होते. सत्तापक्षातील आमदारांनीही अनेक अधिकाऱ्यांची नावे घेऊन त्यांचे आणि वाल्मीक कराडचे सुमधून संबंध समोर आणले. काही अधिकाऱ्यांनी तर ठाण्याला पक्षाचे कार्यालय केले.
याच काळात परळीतील राख माफियागीरीही समोर आली. जर, जिल्ह्यातील पोलिस अधिकारी वाल्मीच्या शब्दाबाहेर नव्हते तर परळीतल्या अधिकाऱ्यांकडून वेगळी अपेक्षा कशी. आता त्यांनाही परळी नको.
वाळूचा काळाबाजार चलणाऱ्या गेवराई पोलिस ठाणे किंवा स्थानिक गुन्हे शाखा मिळविण्यासाठी ‘वाट्टेल ते’ करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही आता बीड नकोसे झाले आहे.
संतोष देशमुख हत्येच्या घटनेनंतर पोलिस दलातील अशा अधिकाऱ्यांवर टिकेची झोडही उठली. यातील अनेक आरोपांत सतत्यताही आढळली. दरम्यान, आता विनंती बदल्या मागण्यामागे वरदहस्त आत आणि एसपी नवनीत कॉंवत खमक्या आल्याने काही मंडळींचे हातच बांधल्यासारखे झाले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी गेवराईतून वाळू चोरी प्रकरणी १५० कोटींचा दंड ठोठावला आहे. मग, या काळात गेवराई पोलिस आणि महामार्ग पोलिसांच्या डोळ्यावर काळ्या पट्ट्या असण्याचे कारण काय, असाही सवाल आहे.
पण, आता नवनी पोलिस अधीक्षक नवनीत कॉंवत यांनी सगळेच ‘काळे - बेरे’ धंदे बंद करत पोलिस दलात पोलिसींग आणली आहे. त्यामुहे जिल्ह्यात राहून तरी उपयोग काय, अशी काही अधिकाऱ्यांची भावना झाल्याने त्यांनीही काढता पाय घ्यायचे ठरविले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.