Beed Crime : बीड जिल्हा कारागृहात २ पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन; ‘व्हीआयपी’ ट्रीटमेंटप्रकरणी वरिष्ठांचा दणका

बीड जिल्हा कारागृहात मोक्काचा मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांना नियमबाह्य सवलती, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, फोन कॉल सुविधा आणि विशेष वागणूक दिली जात असल्याचा गंभीर तक्रारी दाखल.
police suspended

police suspended

Sakal
Updated on: 

बीड - सरपंच संतोष देशमुख हत्या व खंडणी प्रकरणातील मोक्का आरोपी वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीला मिळणारी अवाजवी व्हीआयपी ट्रीटमेंट, क्षमतेपेक्षा जास्त कैदी अन् गेल्या काही महिन्यांत झालेले गँगवॉर... यांमुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेले बीड जिल्हा कारागृह पुन्हा एकदा मोठ्या प्रशासकीय कारवाईने हादरले आहे. कारागृहातील भोंगळ कारभारावर धडक ॲक्शन घेत वरिष्ठ पातळीवरून दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे, तर अनेक कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याने कारागृह प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com