Beed Crime: सर्पदंश की घातपात ? रस्त्यावर मृतदेह आढळलेला आवादा कंपनीचा तो कामगार कोण ?
Kej Massajog News: बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील आवादा एनर्जी नामक पवनऊर्जा कंपनीच्या स्टोअरमध्ये पंजाब राज्यातील गुरूदासपूर येथील रचपाल हमीद मसीह हा कामगार म्हणून सेवेत होता.
केज, ता. १७ (बातमीदार): सरपंच संतोष देशमुख हत्या आणि खंडणीसंदर्भातील प्रकरण चर्चेत असतानाच आवादा एनर्जी कंपनीत काम करणाऱ्या एका कामगाराचा केज-अंबाजोगाई रस्त्यावरील एका हॉटेलसमोर शुक्रवारी (ता.१७) सकाळी मृतदेह आढळला आहे.