Beed News: केकतसारणी पाझर तलाव घोटाळा उघडकीस; एसडीओंच्या भेटीनंतर खनिज माफियांचे धाबे दणाणले

llegal Mining Allegations at Kekatsarani Percolation Tank: बीड जिल्ह्यातील केकतसारणी पाझर तलाव घोटाळ्यावर प्रशासनाची कारवाई सुरू. एसडीओ दीपक वजाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला; बेकायदेशीर उत्खनन प्रकरणात मोठ्या माशांवर कारवाई होणार का याकडे जिल्ह्याचे लक्ष.
Beed News

Beed News

esakal

Updated on

बीड: केज तालुक्यातील केकतसारणी येथील पाझर तलावाचे चक्क खाणीत रूपांतर करणाऱ्या गौण खनिज माफियांविरोधात आता प्रशासनाने कंबर कसली आहे. तक्रारदार रमाकांत धायगुडे यांच्या प्रदीर्घ लढ्याला यश येत असून, उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे यांनी गुरुवारी (ता.१२) प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन या महाकाय खदानीचा पंचनामा केला. प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून त्या खडी क्रशर मालकासह राजकीय नेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

ज्या ठिकाणी ३ एकरचा पाझर तलाव असायला हवा होता, तिथे आज १५० फूट लांब आणि ४० फूट खोल महाकाय विवर पाहून अधिकारीही अवाक झाले. हजारो ब्रास मुरूम आणि दगडाचे बेकायदेशीर उत्खनन करून निसर्गाचा आणि सरकारी मालमत्तेचा जो काही कोथळा बाहेर काढला आहे, त्याचे वास्तव पंचनाम्यातून समोर येईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com