Beed News: रॉकेल तर मिळेल हो, पण स्टोव्ह आणायचा कोठून?; गृहिणींना पडला प्रश्न; पुन्हा एकदा स्टोव्ह शोधण्यासाठी महिलांच्या हालचाली झाल्या सुरू

Litre Kerosene Allocation Challenges Local Women: महागाईमुळे ३ लिटर रॉकेलसाठी नवीन स्टोव्ह खरेदी करणे गरिबांसाठी कठीण. प्रशासन रॉकेलचा वापर 3- नियंत्रणाखाली ठेवण्याचे आश्वासन देत असून, स्टोव्ह आणि मोजमाप साधने उपलब्ध करणे गरजेचे ठरले आहे.
Beed News

Beed News

esakal

Updated on

​बीड: अंगाची लाहीलाही करणारा रणरणता उन्हाळा आणि त्यात गॅस सिलिंडरच्या गगनाला भिडलेल्या किमती... महागाईच्या या दुष्टचक्रात सामान्य माणूस पार होरपळून निघाला आहे. अशातच राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाने तब्बल सात वर्षांच्या प्रदीर्घ विरामानंतर पुन्हा एकदा ग्रामीण भागात रेशन दुकानांवर निळ्या रॉकेलची (केरोसीन) धार वाहणार आहे.

पण, या निर्णयाने आनंदापेक्षा बीडच्या गृहिणींसमोर एक मोठा यक्षप्रश्न उभा ठाकला आहे. ज्या पिढीने सात वर्षांपूर्वी उज्ज्वला गॅस आल्यावर आपल्या घरातील जुने पितळी स्टोव्ह, पंपाच्या शेगड्या पोटमाळ्यावर भिरकावून दिल्या किंवा भंगारवाल्याला कवडीमोलाने विकल्या, त्या गृहिणी आता कपाळावर हात मारून विचारत आहेत की, रॉकेल तर मिळेल हो, पण ते जाळायला स्टोव्ह आणायचा कोठून?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com