

Beed Crime: Five Seriously Injured in Knife Attack Over Firecracker Dispute, Three Arrested
esakal
Beed Knife Attack: बीड जिल्ह्यातील गेवराई शहरात फटाका फेकण्याच्या किरकोळ वादातून पाच जणांवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. मंगळवारी (ता. १०) सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास पवार गल्लीत ही घटना घडली. या हल्ल्यात पाच जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.