
यावर्षी देखील त्यांनी एकतीस जोडप्यांची नोंदणी करत विवाह लावण्याचा निर्णय घेतला होता .परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेत त्यांनी केवळ अकरा लग्नच मंडपात लाव
माजलगाव (जि. बीड): शहरातील बॅंक काॅलनी भागात लग्नात मोठ्या प्रमाणात गर्दी जमवून कोरोनाचे नियम तोडल्याप्रकरणी आयोजक बाळू ताकट यांचेसह पंचवीस जणांविरूध्द शहर पोलिसात रविवारी (ता. 21) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. तालुका व परिसरातील शेतक-यांसह सर्वसामान्यांच्या उपवर मुलां - मुलींच्या विवाहावर होणारा अनावश्यक खर्च टाळला जावा या उद्देशाने मागील अकरा वर्षांपासून शिवजयंतीनिमीत्त बाळू ताकट हे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करतात.
यावर्षी देखील त्यांनी एकतीस जोडप्यांची नोंदणी करत विवाह लावण्याचा निर्णय घेतला होता .परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेत त्यांनी केवळ अकरा लग्नच मंडपात लावले व वीस लग्न हे संबंधिताच्या घरी लावण्यात आले. विवाह सोहळ्यास छत्रपती संभाजीराजे भोसले हे उपस्थित होते. लग्नसमारंभास मोठी गर्दी जमी होती.
दोन मित्रांची 2021 ची शिवजयंती ठरली अखेरची! घरी परतत असताना अपघातात दोघांचा...
आयोजकांनी व त्यांच्या साथीदारांनी 144 कलमचा नियम तोडत मोठी गर्दी केली होती. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काढण्यात आलेल्या निमांचा भंग केला व कोरोना संसर्ग पसरविणे आदी नियम तोडल्याप्रकरणी शहर पोलिसांनी रात्री उशिरा पोलिस शिपाई अमृत मोहन पाटोळे यांच्या फिर्यादीवरून आयोजकासह पंचवीस जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील वीज ग्राहकांकडे एक कोटी थकबाकी; महावितरणची वसुलीसाठी ग्राहकांच्या...
यांचेवर झाला गुन्हा दाखल
आयोजक बाळू ताकट, राहुल मुगदिया, ऋषिकेश शेंडगे, प्रशांत होके, सुरज पवार, संजय दिग्रसकर, अमर राजमाने, अतुल होके, प्रदीप जाधव, सचिन सुरवसे यांचेसह अज्ञात 10 ते 15 जणांविरूध्द शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.