सालगड्याला आला लाखांचा भाव, बागायतदार शेतकरी मेटाकूटीला

salgadi
salgadi
Updated on

माजलगाव (बीड): मजुरांचा वाढता भाव आणि बहुभुधारक शेतक-यांकडे असलेले अपुरे मनुष्यबळ यामुळे शेतीच्या मशागतीसाठी आवश्यक असलेल्या सालगड्याला लाख रूपयांचा भाव आला आहे. तर दुसरीकडे वर्षभर अडकून नको रं बाबा म्हणत सालगडी राहण्यासाठी मजुर धजावत नसल्याने बहुभूधारक शेतकरी मात्र मेटाकुटीस आला असून परजिल्ह्यातून सालगड्याच्या शोधात आहेत.

तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बागायती क्षेत्र आहे. माजलगाव धरण शंभर टक्के भरले असल्यामुळे उसाचे क्षेत्रामध्ये मोठी वाढ झाली आहे. तर बागायतदार शेतकरी फळबाग लागवडीकडे वळला आहे. उस लागवडीवर भर असल्यामुळे छोटा - मोठा शेतकरी व मजुरी करणारे शेतकरी देखील परिसरातील कारखान्याकडे उसतोडणी करतो. यामुळे सालगड्याची मात्र वाणवा होत आहे.

गुढीपाडवा हा शेतक-यांसाठी नवीन वर्षे असते. शेतकरी सालगड्यांची नियुक्ती यावेळेस करतो. एकीकडे निर्माण झालेल्या कोरोनाच्या संसर्गामुळे शेतीसह सर्वच व्यवहार ठप्प होत चालले आहेत. तर कापूस वेचणीपासून ते सोयाबीन, ज्वारी, गहू, हरभरा या पिकांच्या काढणीकरिता मजुरांची उपलब्धता होत नाही. परिणामी पर जिल्ह्यातून मजुरांस आणावे लागते.

आता सालगडी देखिल उपलब्ध होत नसल्याने परजिल्ह्यातून नवरा - बायको जोडी अशी सालगडी ठेवण्यावर शेतकरी भर देत आहे. एकीकडे सालगडी म्हणुन काम केल्यास वर्षभर अडकुन पडावे लागते. त्यामुळे वर्षभर अडकुन नको अशी भुमिका मजुरांची असल्याने बहुभूधारक शेतक-यांच्या अडचणीत वाढ होत आहे.

ठोका पध्दतीने शेती देण्यावर भर
सालगड्यांची वाणवा असल्याने अनेक मोठे बागायतदार शेतकरी औंदा शेती बारदाना मोडीत काढून दोन - तीन वर्षांच्या करारावर ठोका पध्दतीने शेती देण्यावर भर देत आहे. मोसमी कामाच्या दिवसात मजूर टंचाईमुळे शेती कामे होत नसल्याने बागायतदार शेतक-यांची पंचाइत झाली आहे. 


परिसरातील सालगडी लावल्यास वर्षभर काम करतांना अनेक अडचणी निर्माण होतात. लाख रूपये देउन देखिल सालगडी मात्र मनमानीच करतात. परिणामी शेतातील कामे खोळंबतात. त्यामुळे उत्पन्नावर मोठा परिणाम होउन आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागतो. परजिल्ह्यातील सालगडी नाविलाजाने लावावे लागतात. - रमेश सोळंके, शेतकरी, लोणगाव.



सालगड्याशी आर्थिक व्यवहार ठरल्यास मराठी नववर्षे गुढीपाडव्यापासुन हे सालगडी बागायतदार शेतक-यांकडे कामावर रूजु होतात. परंतु शेतातील बहुतांश कामे ही सध्या ट्ॅक्टरव्दारे व यांत्रिकीकरणात होत आहे. तरीदेखिल शेतीखर्च पेलवत नाही. तरूणवर्ग कष्टाची कामे करण्यापेक्षा शहरातील कंपन्याकडे वळला जात आहे. परिणामी ग्रामीण भागात मजुरांची टंचाई जाणवत आहे. - कृष्णा थावरे, शेतकरी शुक्लतिर्थ लिमगाव.
 

(edited by- pramod sarawale) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com