esakal | धक्कादायक! जागेचा वादातून सावत्र आईकडून मुलाचा खून

बोलून बातमी शोधा

crime news Beed

याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात तिघाजणांविरोधात गुरुवार (ता.आठ) एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे

धक्कादायक! जागेचा वादातून सावत्र आईकडून मुलाचा खून
sakal_logo
By
वैजिनाथ जाधव

गेवराई (बीड): जागेच्या वादातून सावत्र आईने मुलाला केलेल्या हाणामारीत मुलाचा खून झाल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील लुखामसला येथे घडली. याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात तिघाजणांविरोधात गुरुवार (ता.आठ) एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेवराई तालुक्यातील लुखामसला येथील भगवान डोमाळे यांना दोन पत्नी असून सात अपत्य आहेत. यापैकी पाडूरंग भगवान डोमाळे (वय 38 )वर्ष यांचा व इतर सावत्र भावाचा जागेचा वाद होता. हा वाद आपसात मिटत नव्हता यामुळे त्यांचे सतत भांडण होत होते. दरम्यान गुरुवार (ता.एक) रोजी रात्री हा वाद हाणामारी पर्यत गेला असता पांडुरंग डोमाळे यांच्या डोक्यात कु - हाड लागली होती. यामुळे पाडुरंग यांना अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

Coronavirus| केंद्रीय पथक येताच लागले कंन्टेनमेंट झोनमध्ये फलक

शुक्रवार (ता.दोन) एप्रिल रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. यामुळे सावत्र आई , तिचा सख्खा मुलगा आणि मुलाच्या मुलाने मिळून खून केल्याप्रकरणी मयताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये रेणुका भगवान डोमाळे (वय 50) , वैजिनाथ भगवान डोमाळे ( वय 40) व योगेश वैजिनाथ डोमाळे ( वय 20) यांच्या विरूद्ध कलम 302, 506, 34, 323 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खळबळजनक! बँकेच्या परीक्षेला आलेल्या तरुणाची भोसकून हत्या; हात छाटला

दरम्यान मारेकरी फरार असून या प्रकरणाचा पुढील तपास गेवराई पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल साबळे हे करीत आहेत .