esakal | Women's day 2021: संघर्षातून बनल्या गटविकास अधिकारी, माजलगावच्या प्रज्ञा माने यांची यशोगाथा

बोलून बातमी शोधा

womens day}

सध्या प्रज्ञा माने माजलगाव पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी म्हणून कार्य करत आहेत

marathwada
Women's day 2021: संघर्षातून बनल्या गटविकास अधिकारी, माजलगावच्या प्रज्ञा माने यांची यशोगाथा
sakal_logo
By
कमलेश जाब्रस

माजलगाव (बीड): आई-वडिलांचे स्वप्न मुलगी अधिकारी झाली पाहिजे. हे स्वप्न मनाशी बाळगत माध्यमिक शिक्षणापासून स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत २०१३ साली विक्रीकर निरीक्षक होत प्रज्ञा लक्ष्मण माने यांनी यश प्राप्त केले तर त्यानंतर वेगवेगळ्या परीक्षा देत आज त्या माजलगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

प्रज्ञा माने यांचे वडील पोलिस सेवेत नोकरीला तर आई गृहिणी. प्राथमिक शिक्षण मुंबई येथे झाले तर दहावीचे शिक्षण सांगली येथील कन्या प्रशालेत झाले. यानंतर विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. एम.एस्सी. मायक्रोबायोलॉजी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले. यानंतर पुणे येथे राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी अभ्यासाला सुरुवात केली.

Maratha reservation: सर्वोच्च न्यायालयात आजपासून मराठा आरक्षणावर सुनावणी

वेळेचे व अभ्यासाचे नियोजन करत तसेच वेगवेगळ्या पुस्तकांचे, वर्तमानपत्रांचे वाचन केले. पुढील महिन्याच्या अभ्यासाचे नियोजन एक महिना आधीच केले. हे करत असताना अभ्यासामध्ये सातत्य ठेवले. जिद्द, चिकाटी व अभ्यासामधील एकाग्रता यामुळे २०१३ साली राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या विक्रीकर निरीक्षक परीक्षेत यश मिळविले, माझगाव येथे विक्री विभागात विक्रीकर निरीक्षक म्हणून नोकरीस सुरूवात केली.

यानंतर २०१४ मध्ये सहायक गटविकास अधिकारी म्हणून यश मिळविले. दीड वर्षे नागपूर येथे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर राहता व वर्धा येथे पंचायत समितीमध्ये सेवा केली. वर्ष २०२० मध्ये प्रज्ञा माने यांना गटविकास अधिकारी म्हणून माजलगाव पंचायत समितीमध्ये पदोन्नती मिळाली. सध्या माजलगाव पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी म्हणून त्या कार्य करत आहेत.

लग्नसमारंभ आटोपून घरी निघालेल्या जीपला जोराची धडक; दोघे ठार, तर चार जखमी

विशेष म्हणजे राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची पूर्वतयारी प्रज्ञा माने या करत होत्या. दरम्यानच्या काळातच वडीलांचे अकाली निधन झाले. कुटुंबाचे अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगत खचून न जाता कठोर परिश्रम करत राज्य लोकसेवा आयोगाच्या वेगवेगळ्या परीक्षा देत यश मिळवीत राहिल्या. त्यांचे पती विशाल भोसले माजलगाव पालिकेचे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत आहेत. 

सर्वच क्षेत्रामध्ये मुली अग्रेसर आहेत. ग्रामीण भागातील मुलींनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अभ्यासामध्ये सातत्य ठेवल्यास ध्येयप्राप्ती निश्चीत मिळते. मुलींनी विविध पुस्तकांचे, वर्तमानपत्रांचे वाचन करणे, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शक पुस्तकांचे वाचन करावे, अभ्यासाचे व वेळेचा नियोजन केल्यास यश निश्चीत मिळते. 
- प्रज्ञा माने, 
गटविकास अधिकारी, माजलगाव 

(edited by- pramod sarawale)