

Habitual criminal arrested with country-made pistol and cartridges in Beed.
Sakal
बीड : दिवाळीचा सण आनंदात आणि उत्साहात सुरू असतानाच, बीड शहरात कायदा व सुव्यवस्थेला सुरुंग लावण्याचा कट रचणाऱ्या एका सराईत आणि अट्टल गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने अत्यंत थरारक कारवाई करत जेरबंद केले आहे. शहरात वर्दळीच्या समजल्या जाणाऱ्या सागर हाइट्स परिसरात पोलिसांनी सापळा रचून मध्यप्रदेशातील इंदूर येथील गुन्हेगाराला गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसांसह रंगेहात पकडले आहे. या धडक कारवाईमुळे बीडच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, सणाच्या तोंडावर पोलिसांनी मोठा अनर्थ टळल्याचे दिसत आहे.