Accused apprehended along with stolen property following the arrest of an inter-district gang of thieves
sakal
बीड - जिल्ह्यात वाढत्या घरफोड्या आणि वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी आक्रमक भूमिका घेत स्थानिक गुन्हे शाखेने एका आंतरजिल्हा गुन्हेगारांच्या टोळीला जेरबंद करण्यात मोठे यश मिळवले आहे. जालना जिल्ह्यातील तिर्थपुरी (ता. घनसावंगी) येथील चार सराईत चोरांना बेड्या ठोकून पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल ९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धडक कारवाईमुळे बीडसह परिसरातील गुन्हेगारी वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांच्या या दणकेबाज कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.