बीड: संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार वाल्मीक कराडचा प्रशासनात दबदबा असताना परळी पोलिस ठाण्यातून स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक म्हणून उस्मान शेख यांची नेमणूक झाली. त्यामुळे या घटनेनंतर ते आरोप आणि टिकेचे धनी ठरले. दरम्यान, त्यांची लातूरला मंगळवारी (ता. २७) बदली झाली.