
बीड : मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान बीड व माजलगावमध्ये झालेल्या जाळपोळीच्या घटनांच्यामागे वाल्मीक कराडचा हात होता. आमची घरं जाळून मनोज जरांगे यांना बदनाम करायचे आणि त्यांना अटक करायचा वाल्मीकचा प्लॅन होता, असा गंभीर आरोप माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी केला.