

बीड : पत्नी, दोन मुलांचा खून केल्याप्रकरणी आरोपीस दोषी ठरवत न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. संतोष जयदत्त कोकणे (रा. तकवा कॉलनी, शुक्रवार पेठ, बीड) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद एल. यावलकर यांनी गुरुवारी हा निकाल दिला.