बीड: ‘मांजरा’ धरण शंभर टक्के | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

manjra dam

बीड: ‘मांजरा’ धरण शंभर टक्के

केज: बीड, लातूर आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेले मांजरा धरण आता शंभर टक्के भरले आहे. पाण्याचा येवा सुरू असल्याने मंगळवारी (ता. २१) धरणाच्या उजव्या कालव्यातून १.२७ प्रति सेकंद घनमीटरने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती शाखा अभियंता शाहूराज पाटील यांनी दिली.

हेही वाचा: औरंगाबाद महापालिकेत शिवसेना-भाजप युती नको - भागवत कराड

यावर्षीच्या पावसाळ्याचे तीन महिने संपले तरीही मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मात्र समाधानकारक पाऊस झालेला नव्हता. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठे पाऊस न झाल्याने धरणात येणाऱ्या पाण्याचा येवा अत्यंत कमी राहिला. अधूनमधून होत असलेल्या पावसामुळे कमी प्रमाणात पाणी धरणात आले होते. पावसाळ्याच्या तीन महिन्यात या धरणात केवळ २६ टक्केच उपयुक्त पाणीसाठा होवू शकला होता. पण, ऑगस्ट अखेर व सप्टेंबरच्या सुरवातीपासूनच मात्र या धरणात मोठ्या प्रमाणात पाणी येऊ लागले होते.

काही दिवस तर रोज आठ ते दहा दशलक्षघनमीटर पाण्याचा येवा धरणात राहिला होता; तसेच पाणलोट क्षेत्रात मोठे पाऊस झाले होते. त्यामुळे गेल्या आठ-दहा दिवसांत पाणलोट क्षेत्रात पाऊस झाला नाही तर नदी नाल्यातून पाणी मात्र धरणात आले. याचा परिणाम हे धरण आता शंभर टक्के भरले आहे. या धरणाचा प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा क्षमता १७६.९६३ दशलक्षघनमीटर आहे. ता. २० सप्टेंबरला हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.

पातळी नियंत्रणासाठी येवा सुरूच

धरणात पाण्याचा येवा सुरूच आहे. जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, कार्यकारी अभियंता रोहित जगताप, सहायक अभियंता अभिजित नितनवरे, शाखा अभियंता शाहूराज पाटील हे सर्व अभियंते धरणातील पाणीसाठ्याकडे लक्ष ठेवून होते.

धरण भरले असल्याने पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाच्या उजव्या कालव्याद्वारे पाणी सोडले गेले आहे. या कालव्यातून १.२७ प्रति सेकंद घनमीटरने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. धरण भरल्याने लातूरच्या पिण्याच्या पाण्याचा तसेच सिंचनाच्या पाण्याचा प्रश्नही सुटला आहे.

Web Title: Beed Manjra Dam Full

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Beedmanjara dam
go to top