.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Dhanora: अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा तटबोरगाव रस्त्यावरील ओढ्यावरील पर्यायी पूल वाहून गेल्याने गेल्या पंधरा दिवसापासून वाहतूक बंद आहे. वाहतूक बंद असल्याने तटबोरगाव आणि परिसरातील नागरिकांची गैरसोय होत आहे.
पावसाळ्यापूर्वी धानोरा तटबोरगाव रस्त्याचे पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून काम करण्यात आले आहे. मांजरा नदीच्या पलीकडील ओढ्यावरील पूलाचे काम अर्धवट राहिल्याने पर्यायी पूल करण्यात आला होता. मात्र सतत पाऊस सुरू असल्याने सतत हा पर्याय पूल वाहून जात असल्याने नागरिकांना ये- जा करण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागत आहे.