Beed Crime
sakal
मराठवाडा
Beed Crime: घरगुती वादातून तरुणाचा खून; जवळगाव येथील प्रकरणाचा उलगडा, चौघांना अटक
Beed News: बीड जिल्ह्यातील जवळगाव येथे घरगुती वादातून तरुणाचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने तपास करून चौघांना अटक करत प्रकरणाचा उलगडा केला.
बर्दापूर (जि. बीड) : जवळगाव (ता. अंबाजोगाई) येथे अनोळखी मृतदेह आढळला होता. बीड स्थानिक गुन्हे शाखेने तपास करून खुनाचा गुन्हा उघडकीस आणला. मुख्य संशयितासह चौघांना अटक करण्यात आली आहे.

