Beed : पत्नी व मुलाची केली हत्या आरोपीस अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accused arrested

Beed : पत्नी व मुलाची केली हत्या आरोपीस अटक

माजलगाव : पत्नी व मुलाची हत्या केल्याची घटना तालुक्यातील मंजरथ येथील काळे वस्तीवर आज मंगळवारी ता. 11 पहाटे तीन वाजता घडली असून आरोपीस माजलगाव ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

मंजरथ पासून जवळच असलेल्या काळे वस्तीवर वास्तव्यास असलेले पांडुरंग दोडतले यांनी त्यांची पत्नी लक्ष्मी पांडुरंग दोडतले व मुलगा पिल्या पांडुरंग दोडतले या दोघांची झोपेतच तीक्ष्णहत्याराणे हत्या केल्याची घटना मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. पत्नी व मुलाची हत्या केल्यानंतर पांडुरंग दोडतले याने ग्रामीण पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली.

पहाटेच घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन आरोपी पांडुरंग दोडतले यास अटक केली. या घटनेने मंजरथ परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटना कोणत्या कारणामुळे घडली याचा पोलीस तपास करत आहेत.