बीड : राष्ट्रीय महामार्ग बनतोय जीवघेणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Beed National Highway dengerous to travelling

बीड : राष्ट्रीय महामार्ग बनतोय जीवघेणा

किल्लेधारूर : शहरातून राष्ट्रीय महामार्ग ५४८ सी गेला आहे. हा महामार्ग मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा दुवा समजला जातो. मात्र धारूर शहरात झालेल्या या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याचे दिसून येत आहे. शहरात बऱ्याच ठिकाणी रस्त्याला मधोमध मोठ्या भेगा पडल्या आहेत. कुठे रस्ता खचला आहे तर कुठे दुभंगला आहे. या रस्त्यावर सुरक्षेबाबत फलकही लावलेले दिसत नाही. यामुळे चालक गोंधळून जातात. शिवाय अपघातही होत आहेत.

शहरातून खामगाव-पंढरपूर हा रस्ता गेला आहे. या रस्त्याचे काम काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे झाले आहे. शहरात बऱ्याच ठिकाणी रस्ता खचलेला आहे. काही ठिकाणी तो मधोमध दुभंगला आहे. शहरात कुठेही या रस्त्यावर सूचना फलक लावल्याचे दिसत नाहीत. फक्त गावांच्या नावांचे फलक दिसतात. या रस्त्यावर मागील दोन ते तीन वर्षांत पंधरा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मागील पंधरा दिवसांपूर्वी तेलगाव रस्त्यावर पाच वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. या रस्त्यावर नेहमी नागरिकांची वर्दळ असते. यामुळे कंत्राटदाराने याठिकाणी सूचना फलक लावणे आवश्यक आहे. शिवाय गतिरोधकही उभारणे गरजेचे आहे. मात्र प्रशासनाला याचा विसर पडल्याने नागरिकांसह वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

शहरातून राष्ट्रीय मार्ग गेल्यामुळे अवजड वाहनांची संख्या वाढली आहे. घाट व रस्ता अरुंद असल्याने नेहमीच अपघात होत आहेत. त्यात कंपनीच्या वतीने या रस्त्यावर कोणतेही सूचना फलक लावलेले नाहीत. कंपनीने महत्त्वाच्या ठिकाणी सूचना फलक लावावे. तसेच शहरात गतिरोधक तत्काळ बसवावेत.

-धनंजय शिनगारे, स्थानिक नागरिक.

Web Title: Beed National Highway Dengerous To Travelling

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top