Accident : ज्योत आणण्यासाठी गेले अन् घात झाला; आष्टीतील दोघांचा अपघातात दुर्दैवी अंत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accidnent

Accident : ज्योत आणण्यासाठी गेले अन् घात झाला; आष्टीतील दोघांचा अपघातात दुर्दैवी अंत

आष्टी : सोमवार पासून सुरू होत असलेल्या नवराञ उत्सवानिमित्ताने आष्टी तालुक्यातील पाटण सांगवी येथील तरुण युवक दरवर्षी तुळजापूर, माहूरगड, मोहटादेवी याठिकाणी जाऊन ज्योत आणत असतात. आष्टी तालुक्यातील पाटण सांगणी येथील काही तरूण शनिवारी सकाळी ११ वाजता ज्योत आणण्यासाठी तुळजापूर येथे जात असतांना येरमाळा जवळ मोटार सायकलवर जात असलेल्या उपसरपंच अमोल सुरेशराव खिलारे (वय ३८) व कडा येथे आरोग्य सेवक म्हणून कार्यरत असलेले महेश भास्करराव भोसले (वय ३१) यांचे जागीच निधन झाले असून पाटण सांगवी गावावर शोककळा पसरली आहे.

आष्टी तालुक्यातील प्रत्येक गावातील तरूण ज्योत आणण्यासाठी एकञ येत घटस्थापनेच्या आगोदर तुळजापूर, मोहटादेवी, माहूरगड आशा देवींचे असलेले ठाणे तिथून ज्योत आणून घटस्थापना करतात.शनिवारी आष्टी तालुक्यातील पाटण सांगणी येथील काही तरुण तुळजापूर येथे ज्योत आणण्यासाठी निघाले. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास धुळे-सोलापूर महामार्गावरील येरमाळा येथे अमोल खिलारे व महेश भोसले हे मोटारसायकलवर चालले होते. त्यांच्या मोटार सायकलला अपघात होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.

त्यांच्या निधनाने सांगवी पाटण या गावावर शोककळा पसरली आहे. मयत दोन्ही तरुणावर रविवारी सकाळी सांगवी पाटण येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.