अॅपे रिक्षा पलटली एक ठार, चार जखमी 

जगदीश बेदरे
मंगळवार, 27 जून 2017

जखमींवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बीड येथील जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आले आहे. मयताचे शवविच्छेदन येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. याप्रकरणी उशीरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

गेवराई (बीड) : गेवराईहून बीडकडे प्रवासी घेउन निघालेला अॅपेरिक्षा पलटी होउन झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर चार जण जखमी झाल्याची घटना  धुळे - सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील रांजणी जवळ ता.  २७ मंगळवार रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. जखमीवर येथील उपजिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बीड जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले.

गेवराई येथून बीडकडे प्रवासी घेउन निघालेला अॅपे रिक्षा (एम.एच. २३ सी ७४२९) हा अॅपे रिक्षा धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील रांजणीजवळ दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अचानक पलटी होऊन या अपघातात विद्यार्थी नितीन अशोक दहीफळे (वय १७) हा जागीच ठार झाला आहे, तर त्याची आई लोचना दहीफळे वय ४२, नारायण सावंत (वय ६३, रा. रांजणी), सुरेखा सव्वासे (वय ३२, रा. साष्ट पिंपळगाव, ता. अंबड) व अन्य एक असे चारजण गंभीर जखमी झाले होते. त्यांना तत्काळ बीडहून गेवराईकडे येत असलेले विजय सुतार व अक्षय सुतार यांनी येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमींवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बीड येथील जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आले आहे. मयताचे शवविच्छेदन येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. याप्रकरणी उशीरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

गढी येथून बीड तालुक्यातील खंडाळा येथे गावाकडे जात असलेला नुकताच दहावी पास झालेला व प्रवेशासाठी गढी येथील नवोदय विद्यालयात आलेला विद्यार्थी नितिन अशोक दहिफळे वय १७ हा या अपघातात जागीच ठार झाला. त्यांची आई गंभीर जखमी आहे. प्रवेश घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थी यावर काळाने घाला घातला.

Web Title: beed news accident ape rickshaw overturned