

Beed News
sakal
बीड : ब्रेन डेड झालेल्या मुलाच्या नेत्रदानाचा प्रस्ताव डॉक्टरांनी मांडला, त्यावर पित्याने ‘डॉक्टर साहेब, डोळेच काय, माझा मुलगाच घ्या’ म्हणत अवयवदानाची तयारी दर्शविली. वेदनेच्या या क्षणामध्ये उपस्थितांनाही गहिवरून आले. मृत्यूनंतरही अनेकांना जीवनदान देणाऱ्या संग्रामचे वाघाचे काळीज असलेले हे पिता म्हणजे रमेश गाडे.