
vaidyanath sakhar karkhana
esakal
Pankaja Munde: स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी मोठ्या संघर्षातून उभा केलेला बीडच्या परळी तालुक्यात असलेला वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना विक्री करण्यात आलेला आहे. स्व. मुंडे यांनी या कारखान्याला आपलं चौथं अपत्य म्हटलं होतं. त्यांनी मोठ्या कष्टातून कारखान्याला उभारी दिली. मात्र त्यांच्या संघर्षाचा वारसा सांगणाऱ्या पंकजा मुंडे हा कारखाना चालवू शकल्या नसल्याचा आरोप होतोय. वैद्यनाथ कारखान्याचे माजी उपाध्यक्ष फुलचंद कराड, अॅड. परमेश्वर गित्ते, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी कारखाना विक्री झाल्याचं सांगत हे खरेदीखत रद्द करण्याची मागणी केली आहे. शिवाय पंकजा मुंडे यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचाही आरोप कराड यांनी केलाय. मागच्या दहा वर्षात पंकजा मुंडेंनी कारखान्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही वेळ आली, असंही ते म्हणाले.