
पाटोदा: पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी आणि पंचायत समितीच्या आवारात शेतकऱ्यांनी तब्बल पन्नास लाखांच्या बनावट नोटा उधळत आंदोलन केले. येथील पंचायत समिती कार्यालयातील काही कर्मचारी जाणीवपूर्वक नागरिकांची कामे अडवून दलालामार्फत चिरीमिरीची मागणी करतात. तसेच बेकायदेशीर कामे करून लाखो रुपये उकळतात.