Beed News : लाडेवडगाव (ता. केज) येथील एका अल्पवयीन मुलीला छेडछाड करून तिला जिवे मारण्याची धमकी दिली. यावर युसूफवडगाव पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यानुसार चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड : लाडेवडगाव (ता. केज) पोलिस ठाणे हद्दीतील एका वस्तीवरील अल्पवयीन मुलीची छेडछाड करून तिला लग्नासाठी जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली. याप्रकरणी युसूफवडगाव पोलिस ठाण्यात एका महिलेसह चौघांवर पोक्सो कायद्यानुसार गुन्ह्याची नोंद झाली.