
बीड : शहरात अल्फ्राझोलम गोळ्या आणि कोडिनयुक्त औषधांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोघांना बीड शहर पोलिसांच्या डीबी पथकाने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मेडिकल दुकान चालकासह त्याला गोळ्यांचा पुरवठा करणाऱ्या तरुणाचा समावेश आहे. यापूर्वी या प्रकरणी चार जण गजाआड आहेत. त्यामुळे एकूण आरोपींची संख्या सहावर पोचली आहे.