

बीड : जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा चव्हाट्यावर आल्यानंतर पोलिस आणि सामान्यांतील दरी कमी करण्याच्या दृष्टीने पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत विविध उपाययोजना राबवित आहेत. पोलिस ठाण्यातील जनता दरबारानंतर आता नागरिकांना घरबसल्या पोलिसांशी संपर्क करता येणार आहे.